
चाळीसगाव : कल्पेश महाले
जळगाव जिल्ह्यात लाचखोर अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या अनेक घटना एसीबीच्या माध्यमातून होत असतांना नुकतेच चाळीसगाव शहरातील केंद्र सरकारच्या आरोग्यवर्धिनी योजनेंतर्गत तक्रारदाराची जमीन भाड्याने घेवून त्यावर नियमित भाडे सुरू करण्यासाठी ५० हजारांची लाच मागून ती राहत्या घरात स्वीकारताना चाळीसगावातील रहिवासी व तत्कालीन तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी शहरातील शशिकला नगर रहिवासी देवराम किसन लांडे यास सोमवारी दुपारी 12 वाजता राहत्या घरातून अटक करण्यात आली. या कारवाईने आरोग्य यंत्रणेतील लाचखोर हादरले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली. धुळे एसीबीचे डॅशिंग पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात सहकार्यांनी लाचखोर अधिकारी लांडे यास शशिकला नगरातील राहत्या घरातून बेड्या ठोकल्या.
यांनी केली कारवाई !
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (वाचक)यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, हवालदार राजन कदम, शरद कटके, पसंतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, गायत्री पाटील, चालक हवालदार सुधीर मोरे यांच्या पथकाने केली.





















