जळगाव मिरर । २६ ऑक्टोबर २०२२
दिवाळीची सर्वच ठिकाणी लगबग आहे, सर्वानीच दिवाळीचे नवीन कपडे घेत खरेदी करून फोटोसेशन मोठ्या प्रमाणात यंदाच्या दिवाळीत झाले. यात नेत्यापासून ते अभिनेत्रीपर्यंत सर्वानीच दिवाळीची पार्टी अजूनही रंगत आहे. बॉलीवूडमधील कलाकार रोज पार्टीमध्ये हजेरी लावतात. आणि आपल्या अदाने पोज देतात आणि अर्थातच दिवाळी आहे तर ड्रेसिंग स्टाइलपण शानदार असणार. पण कधी कधी हीच ड्रेसिंग स्टाइल कलाकारांना खुप महागातही पडते, असंच काहीसं भूमी पेडणेकरच झालं आहे. तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.
सोनम कपूरने दिवाळीनिमित्त तिच्या घरी एका ग्रँड पार्टीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आता सोनमच्या पार्टीत पोहोचलेली भूमी पेडणेकर तिच्या ड्रेसमुळे खूप ट्रोल होत आहे आणि लोक तिचा हा ड्रेसिंग उर्फी जावेदच्या ड्रेसिंग स्टाइल सारख्या असल्याचे सांगत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला भूमी पेडणेकरचा हा व्हिडिओ एका सेलिब्रिटी फोटोग्राफरने त्याच्या इंस्टाग्राम शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये भूमी पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे, जो खूपच डीप नेक आहे. अनेकवेळा व्हिडिओ पाहिल्यानंतरही भूमीची ही ड्रेस स्टाइल पब्लिकला समजलीच नाही. त्यामुळे तिच्या कपड्यांवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आहेत.
व्हिडिओवर कमेंट करत एका यूजरने लिहिले की, “हा तर उर्फी जावेदचा प्रभाव आहे. आणखी एका युजरने लिहिले की, “दिवाळी सेलिब्रेशनच्या नावाखाली अश्लीलता आणली जात आहे. तर दुसर्या युजर्सने व्हिडिओवर लिहिले की, “उर्फीने विचित्र ड्रेसिंग स्टाइलचा अजेंडा फिल्मी दुनियेत घेऊन आली आणि बॉलीवूडमध्ये तिची हवा फिरत आहे.
