• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

नवउद्योजकांसाठी नवे व्यासपीठ; जळगावात ‘काईट’ इन्क्युबेशन सेंटर सुरू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 31, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
नवउद्योजकांसाठी नवे व्यासपीठ; जळगावात ‘काईट’ इन्क्युबेशन सेंटर सुरू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३१ डिसेंबर २०२५

खान्देशातील नवउद्योजक, तरुण व महिलांच्या उद्योगस्वप्नांना बळ देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘खान्देश इन्क्युबेशन टेक्नॉलॉजी अँड आंत्रप्रेनरशिप फोरम’ (KITE) या खान्देशातील पहिल्या कम्युनिटी स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन २८ डिसेंबर २०२४ रोजी जळगाव येथे उत्साहात पार पडले. के.सी.ई. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झालेल्या या सोहळ्यात सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट (मुंबई) चे चेअरमन अशोक दुगाडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी बोलताना अशोक दुगाडे यांनी मराठी तरुणांनी नोकरीच्या मानसिकतेतून बाहेर पडून उद्योजकतेकडे वळावे, असे आवाहन केले. जळगाव किंवा धुळे इतक्यापुरतेच मर्यादित न राहता राज्य व देशपातळीवर आपला व्यवसाय विस्तारावा, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. पी. पी. माहुलीकर होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी ग्रामीण व आदिवासी भागातील उद्योजकतेवर भर देत, नवीन उद्योग हे शाश्वत, पर्यावरणपूरक आणि समाजोपयोगी असावेत, असे मत व्यक्त केले.

प्रास्ताविकात सागर पाटील यांनी स्पष्ट केले की, ‘काईट’ ही केवळ स्टार्टअप्ससाठीच नव्हे, तर सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना (MSME) तांत्रिक व व्यावसायिक मार्गदर्शन देणारी कम्युनिटी-आधारित चळवळ आहे. डॉ. शांताराम बडगुजर यांनी ‘काईट’ हा समाजासाठी आणि समाजाने चालवलेला उपक्रम असल्याचे सांगितले.

कार्यक्रमात ‘काईट’च्या अधिकृत संकेतस्थळाचे उद्घाटन डॉ. भूषण चौधरी, डॉ. विकास गीते, डॉ. युवराज परदेशी व अजिंक्य तोतला यांच्या हस्ते करण्यात आले. तंत्रज्ञानाधारित स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी ‘इलेक्ट्रोसॉफ्ट’ व ‘काईट’ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी इलेक्ट्रोसॉफ्टतर्फे निलेश वाघ व राजेश ठाकरे यांनी स्वाक्षरी केली. ‘काईट’च्या संचालक मंडळात डॉ. शांताराम बडगुजर, डॉ. युवराज परदेशी, सागर पाटील व ऋतगंधा देशमुख यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय धनगर यांनी केले, तर डॉ. युवराज परदेशी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी के.सी.ई. इंजिनिअरिंग कॉलेज, आयएमआर कॉलेज, अपेक्स स्टार्टअप ग्रुप, सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट व काईट परिवाराने मोलाचे सहकार्य केले.

Related Posts

पैशांवरून जबर मारहाणीत तरुणाचा मृत्यू : जळगावात घडली घटना !
क्राईम

पैशांवरून जबर मारहाणीत तरुणाचा मृत्यू : जळगावात घडली घटना !

March 23, 2026
कासोदा फाट्यावर भीषण अपघात; भरधाव कंटेनरच्या धडकेत शेतकरी ठार
क्राईम

कासोदा फाट्यावर भीषण अपघात; भरधाव कंटेनरच्या धडकेत शेतकरी ठार

March 23, 2026
रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !
क्राईम

रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

March 22, 2026
जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!
जळगाव ग्रामीण

जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

March 22, 2026
प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !
क्राईम

प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

March 22, 2026
भाऊच ठरला वैरी : दारूच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाची निर्घृण हत्या !
क्राईम

भाऊच ठरला वैरी : दारूच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाची निर्घृण हत्या !

March 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पैशांवरून जबर मारहाणीत तरुणाचा मृत्यू : जळगावात घडली घटना !

पैशांवरून जबर मारहाणीत तरुणाचा मृत्यू : जळगावात घडली घटना !

March 23, 2026
कासोदा फाट्यावर भीषण अपघात; भरधाव कंटेनरच्या धडकेत शेतकरी ठार

कासोदा फाट्यावर भीषण अपघात; भरधाव कंटेनरच्या धडकेत शेतकरी ठार

March 23, 2026
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

तुमच्या वरिष्ठांकडून मिळणाऱ्या मदतीमुळे कार्यालयीन कामात काहीसा दिलासा मिळेल.

March 23, 2026
खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !

खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !

March 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group