जळगाव : प्रतिनिधी
जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची नांदेड येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. तर जळगावात नवे जिल्हाधिकारी म्हणून लातूर महापालिकेचे आयुक्त अमन मित्तल यांची नियुक्ती झाली आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे ३० शुक्रवार रोजी नांदेड येथील जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. तर जळगावातील पदभार नवे जिल्हाधिकारी लवकरच जळगावात येणार आहे. जळगाव जिल्हाधिकारी राऊत हे कोरोना काळात जळगावात आले होते. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील आरोग्याबाबतचे निर्णय घेण्याची उत्तम धुरा त्यांनी घेतली होती.