अमळनेर : विक्की जाधव
शहरातील बंद पडलेले जुने मिटर बदलवून त्याच्या जागी नवीन मीटर बसवून कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्यासाठी स्वतः साठी व कनिष्ठ अभियंता यांच्यासाठी 10 हजाराची लाच मागून त्यातील 5 हजार रुपयांची लाच स्विकारतांना धुळे येथील लाच लुचपत विभागाने वितरण कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञास ताब्यात घेतले आहे.
तक्रारदार यांचे क्रांती नगर भागात घर असून त्यांचे मीटर गेल्या पाच महिन्यापासून बंद होते. तरी देखील सरासरी रकमेची बिल आकारणी सुरू होती. आणि तक्रारदार त्याचा नियमित भरणा करीत होते. गेल्या दहा दिवसांपूर्वी कनिष्ठ अभियंता वैभव देशमुख यांनी तक्रारदार यांच्या मीटर ची पाहणी घरी जाऊन केली होती. त्याविभागतील वायरमन भरत पाटील हे तक्रारदार यांच्या घरी जाऊन कनिष्ठ अभियंता वैभव देशमुख यांच्या सांगण्यावरून जुने वीज मीटर बदलवून देण्यासाठी तुम्हाला दहा हजार रुपये द्यावे लागतील नाहीतर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होईल. असे सांगितल्याने तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत विभागाकडे लेखी तक्रार दिली होती.
यांनी केली कारवाई
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे तसेच पथकातील राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, रामदास बारेला, भुषण खलाणेकर, भुषण शेटे, गायत्री पाटील, संदीप कदम, प्रविण पाटील, मकरंद पाटील, वनश्री बोरसे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, प्रशांत बागुल यांनी केली आहे. या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.