
जळगाव मिरर । २ मे २०२३
जळगाव शहरात संस्कार भारतीच्या साहित्य विभागतर्फे १ मे रोजी महाराष्ट्र दिना निम्मित ज्ञानेश्वर मंदिरात महाराष्ट्रातील लोककला, लोकगीत, विविध बोलिभाषेतील विविध सांस्कृतिक परंपरा यांना अनुसरून येणारे भारूड, ओवी, गवळण, वही गायन,पथनाट्य, पोवाडा मंगळागौर कानबाई, आखाजी गिते पारंपारिक सणावरील गिते इ कलाप्रकार गायन ,नृत्य,किंवा कथन स्वरूपात सादर करण्यात आले. यात महिलांनी एकोणवीस कला उस्फुर्त सादर केल्या.या सोबत च पत्रलेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण ही करण्यात आले.
निकाल पुढील प्रमाणे- छोटा गट कु.अस्मी सागर आपटे सांगली मोठा गट- १. C.K. कापडने जळगाव २. स्वराली वाणी -कारंजा 3 निषाद नेवे -जळगाव
खुला गट- १. सौ.स्वप्नगंधा सुहास जोशी जळगाव २. सौ. वनमाला प्रकाश देवरे जळगाव ३. स्मिता शेखर शुक्ल जळगाव उत्तेजनार्थ- १. सौ.सोनाली गणेश ठाकुर चाळीसगाव २. सौ.अश्विनी सचिन देवळे जळगाव पत्रलेखन स्पर्धेचे परीक्षण संपदा छापेकर यांनी केले.
सदर उपक्रमास शिवशाही पैठणी चे सारिका दानेज, साई कृपा बेन्टेक्स ज्वेलरी च्या हेमलता बामनोदकर वनवभारत बुक डेपो चे निधी नेवे आणि दंत चिकित्सक डॉ लोखंडे यांचे प्रयोजकत्व मिळाले.. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वैशाली पाटील, प्रस्ताविक आशा जोशी, महाराष्ट्र दिन महत्व वरदा देशमुख, यांनी केले. कार्यकमास जिल्हा अध्यक्ष पुरुषोतम पाटील, अध्यक्ष सुभाष महाले, याच्या सोबत प्रमोद जोशी,राजेंद्र माने, चिंतामण पाटील दुष्यत जोशी, नीलकंठ कासार दिलीप चौधरी, अनिल पाटील, गीता रावतोळे,विशाखा देशमुख , संगीता पिंगळे,संपदा छापेकर,श्री फडणीस इ संस्कार भारती चे पदाधिकारी उपस्थिती होती, याशिवाय जळगावकर रसिकानी उपक्रमास उपस्थिती दिली