
जामनेर : प्रतिनिधी
शहरातील नगरपालिकेच्या मुख्य चौकात असलेल्या पूजा हार्डवेअर या दुकानात चोरी झाल्याची घटना दि १५ रोजी उघड झाली आहे. याबाबत जामनेर पोलीस स्थानकात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील नगरपालिकेच्या मुख्य चौकात बाबुराव विठोबा पीठोडे(वय ५६) रा. नवीदाभाडी यांच्या मालकीची पूजा हार्डवेअर या दुकानात दि १५ रोजी दुपारच्या सुमारास १ लाख ५० हजार रुपयाची रोकड तर एका पिशवीत असलेले स्टेट बँकेचे पासबुक, चेकबुक व पेन असा माल लंपास केला आहे. याप्रकरणी बाबुराव विठोबा पीठोडे(वय ५६) यांच्या फिर्यादी वरून अद्यातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास योगेश हिलाल महाजन करीत आहेत.




















