जळगाव मिरर | ५ ऑक्टोबर २०२४
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील विकासकामांचे उद्घाटन करण्यात येत असून या सभेत उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, राहुल गांधी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या पुस्तकाबद्दल आधी त्यांनी माफी मागावी आणि त्यानंतरच शिवाजी महाराजांबद्दल बोलावे, असे आव्हान त्यांनी यावेळी दिले आहे. राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युती सरकारवर टीका केली होती. याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
ठाण्यात सुमारे 32,800 कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी मोदींच्या हस्ते करण्यात आली. यात मुंबई मेट्रो लाइन 3 फेज 1 च्या आरे जेव्हीएलआर ते बीकेसी या टप्प्याचे उद्घाटन देखील झाले आहे. ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पांचीही पायाभरणी मोदींच्या हस्ते झाली. या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेतला आहे.
या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधींनी आधी सर्व शिवप्रेमींची माफी मागावी आणि त्यानंतरच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी बोलावे, असे आव्हान त्यांनी दिले. राहुल गांधी महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलू शकत नसल्याचे ते म्हणाले. राहुल गांधी यांच्या हस्ते कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण आज सकाळी झाले. या कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.