• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी ‘या’ दिवशी मिळणार डिसेंबरचा हप्ता

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 19, 2024
in जळगाव, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी ‘या’ दिवशी मिळणार डिसेंबरचा हप्ता
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर  | १९ डिसेंबर २०२४

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला मोठे यश आले आहे. या महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेली लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी येणार, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात माहिती दिली. अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. तसेच निकषात बदल करण्यात आले नसल्याचे ते म्हणाले.

जुलै महिन्यात लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली. आतापर्यंत या योजनेचे पाच हप्त्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. विधानसभा निवडणुकीमुळे नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच देण्यात आले होते. निवडणुकीनंतर डिसेंबरचे पैसे कधी येणार, असा प्रश्न सर्वांना पडला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आज सभागृहात माहिती दिली. तसेच खात्यामध्ये 1500 की 2100 किती पैसे जमा होणार? योजनेचे निकष काय असतील? या सर्व प्रश्नांवर देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उत्तरे दिली.

आम्ही जी आश्वासने दिली आहेत, ती आम्ही पूर्ण करणार आहोत. कुणीही मनात शंका ठेऊ नये. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे फडणवीस म्हणाले. आमची एकही योजना बंद होणार नाही, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच या योजनेच्या कोणत्याही निकषात बदल करण्यात आलेले नाहीत. ज्यांनी अर्ज केला त्या सर्वांना आपण पैसे देत आहोत, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस सरकारने एकूण 35 हजार 788.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर केल्या होत्या. त्यात लाडकी बहीण योजनेसाठी 1 हजार 400 कोटी रुपयांच्या तरतुदीचा समावेश आहे.

लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करून त्यातील महिलांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधकांच्याकडून केला जात आहे. मात्र, लाडकी बहिण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याचा कोणताही निर्णय झालेला नसल्याचे आमदार आदिती तटकरे यांनी म्हटले. पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिलांना 2100 रुपयांचा लाभ देण्याचे महायुतीने कबूल केलेले आहे. त्यानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याची घोषणा करणार असल्याचे देखील तटकरे यांनी सांगितले आहे. सध्या ज्या महिलांना लाभ मिळत आहे, तो पुढील अर्थसंकल्पापर्यंत तसाच मिळत राहणार असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले होते.

Related Posts

आईला शेवटचा कॉल, तरुणाने संपविले आयुष्य : प्रेम प्रकरणाची चर्चा
क्राईम

आईला शेवटचा कॉल, तरुणाने संपविले आयुष्य : प्रेम प्रकरणाची चर्चा

May 16, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

माणुसकीला काळीमा : धरणगावातील नराधम मुख्याध्यापकाचा चौथीच्या चिमुरडीवर अत्याचार !

May 16, 2026
जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू
क्राईम

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026
जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी : जागतिक अनिश्चिततेतही महसूल, EBITDA आणि रोख निर्मितीत उल्लेखनीय वाढ
जळगाव

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी : जागतिक अनिश्चिततेतही महसूल, EBITDA आणि रोख निर्मितीत उल्लेखनीय वाढ

May 15, 2026
गिरणा नदीपात्रात संशयिताकडून गावठी पिस्टल जप्त !
क्राईम

गिरणा नदीपात्रात संशयिताकडून गावठी पिस्टल जप्त !

May 15, 2026
लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !
क्राईम

लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !

May 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आईला शेवटचा कॉल, तरुणाने संपविले आयुष्य : प्रेम प्रकरणाची चर्चा

आईला शेवटचा कॉल, तरुणाने संपविले आयुष्य : प्रेम प्रकरणाची चर्चा

May 16, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

माणुसकीला काळीमा : धरणगावातील नराधम मुख्याध्यापकाचा चौथीच्या चिमुरडीवर अत्याचार !

May 16, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा

खासगी नोकरी करणाऱ्यांना चांगली ऑफर मिळू शकते

May 16, 2026
जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group