जळगाव मिरर | १९ सप्टेंबर २०२४
जळगाव शहरातील अनेक ठिकाणी रस्त्याचे हाल समोर दिसत असतांना प्रभाग क्र.१ मध्ये गेल्या ८ ते ९ महिने अगोदर बांधकाम झालेली गटार सध्या शहरात तुरळक पाऊस असतांना पडल्याने सध्या मनपाच्या बांधकाम विभाग शहरात सुरु असलेल्या कामाकडे किती लक्ष ठेवते हे यावरून दिसून येत आहे.
शहरातील प्रभाग क्र.१ मध्ये नवीन कानळदा रोडवर नुकतेच उड्डाणपूल वाहतूक सुरु झाली आहे. याठिकाणी राधाकृष्ण नगर चौक ते जुना कानळदा रोड या रिंग रोडलगत गेल्या ९ महिन्या अगोदर मुख्य गटार बनविण्यात आली होती. या गटारीचे काम दिवस – रात्र असे सुरु होते. या घटनेचे नागरिक कौतुक करीत होते. कि मनपाचे ठेकेदार दिवस-रात्र काम युद्धपातळीवर काम सुरु होते. काम आटोपल्याने अनेक नागरिकांनी तत्कालीन नगरसेवक व मनपाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक देखील केले मात्र आता दोन दिवसात शहरात तुरळक पाऊस येताच या परिसरातील गटारीची एक साईड खाली पडल्याने याचे फोटो समोर आले आहे. आता यावर मनपाच्या अधिकारी ‘त्या’ ठेकेदारावर कोणती कारवाई करणार हे बघणे महत्वाचे असणार आहे.
गटारीतून जाते कॉलनीचे सांडपाणी
प्रभाग क्र.१ मधील राधाकृष्ण नगर, इंद्रप्रस्थ नगर, शिव शंकर कॉलनी परिसरातील सांडपाणी या गटारीच्या माध्यमातून पुढे जुना कानळदा रोडवरील मुख्य नाल्यात जात असते. जर याठिकाणी हि गटार पडली आहे. आता यातील पाणी अनेकांच्या प्लॉटमध्ये जावून परिसरातील नागरिकांच्या आरोग्य धोक्यात येवू शकते. याची देखील मनपाला दखल घ्यावी लागेल.