जळगाव मिरर | १६ जुलै २०२४
राज्यात सध्या आषाढीचा जोरदार उत्सव सुरु असतांना नुकतेच आषाढीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांवर काळाने झडप घातली आहे. मुंबईहून पु्ण्याकडे निघालेल्या बसचा पनवेलजवळ रात्री भीषण अपघात झाला आहे. यात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. दरम्यान मुंबईहून सोमवारी रात्री बस पनवेल हद्दीत आली असता, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अचानक बससमोर एक ट्रॅक्टर आला. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच बस ट्रॅक्टरला धडकून 20 फूट खोल दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता, की दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. बसमध्ये 54 प्रवाशी होते यापैकी चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अपघातासंदर्भात नवी मुंबईचे डीसीपी विवेक पानसरे यांनी सांगितले की, सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर अपघात झाला. एका बस मधून 54 जण आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जात होते. प्रवाशांनी भरलेली ही बस ट्रॅक्टरला धडकली. त्यानंतर बस दरीत पडली. अपघातात जखमी झालेल्या 42 जणांना एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे, तर इतर तीन जणांना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आषाढी एकादशी निमित्त अनेक वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने सध्या दर्शनास जात आहे. मात्र, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास वारकऱ्यांच्या ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात झालेला आहे. डोंबिवली येथून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या बसला अंधारात ट्रॅक्टर न दिसल्याने त्यास पाठीमागून जोरदार धडक दिली असून या भीषण अपघात पाच जण जागीच ठार झाले आहेत. तर सात जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
गुरुनाथ बापू पाटील, रामदास नारायण मुकादम,होसाबाई पाटील अशी या अपघातात मयत झालेल्यांची नावे आहे. याशिवाय ट्रॅक्टर मधील दोन जण देखील मयत झाले आहे. आषाढी वारी निमित्त डोंबिवली येथून काही गावातील वारकरी हे चार ट्रॅव्हल बसने पंढरपूरला निघाले होते. एका बसमध्ये 54 प्रवासी होते आणि ती पुढे जात होती. त्यातील एक बसच्या पुढे ट्रॅक्टर जात होता. अंधारात ट्रॅक्टर न दिसल्याने बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली आणि बस 20 फूट खाली कोसळली, यात बसमधले तीन जण मयत झाले तर बाकी प्रवाशी जखमी झाले. यातील काही जणांची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती आहे.