जळगाव मिरर | ७ ऑक्टोबर २०२३
राज्यातील अनेक किल्ल्यांवर पर्यटक नेहमीच जात असतात, अशातच छत्रपती शिवाजी महाराज यांचा आवडता किल्ला असलेल्या पन्हाळगडावर दररोज शेकडो पर्यटक येत असतात. या किल्याची शिवकालिन स्वराज्यातील ऐतिहासिक किल्ला म्हणून देखील ओळख आहे. मात्र, काही दिवसांपासून गडावर प्रेमीयुगुलांचा वावर वाढला आहे. गडावर फिरण्यासाठी आलेल्या प्रेमीयुगुलांकडून अश्लिल चाळे केले जात आहेत.
दि.७ ऑक्टोबर रोजी शुक्रवारी दुपारच्या सुमारास एका प्रेमीयुगुलाने गडावरुन उडी घेत थेट आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच शनिवारी अचानक निर्भया पथकाने गडावर धडक मारली.
पोलिसांनी गडावर धडक मारताच प्रेमीयुगुलांची चांगलीच धांदल उडाली. यावेळी घरी न सांगता पन्हाळगडावर फिरायला आलेल्या प्रेमी युगलांची पोलिसांनी चौकशी केली. तसेच अनेक प्रेमीयुगुलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. यापुढे परवानगी घेऊनच पन्हाळगडावर फिरायला या, असा सज्जड दम पोलिसांनी प्रेमीयुगुलांना दिला.





















