
जळगाव मिरर | ३ जुलै २०२४
दि २ जुलै रोजी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांची विधानपरिषद सदस्य पदासाठी उमेदवारी जाहिर झाल्याबद्द्ल जळगावातील मेहरून परिसरात वंजारी, ओ.बी.सी, समाजाच्या वतीने फटाके फोडून तसेच लाडू वाटून जल्लोष करण्यात आला.
यावेळी माजी महापौर सिमाताई भोळे, माजी.नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील,सोमनाथ पाटील, दामोदर पाटील, माजी.सैनिक किशोर ढाकने, भाग्येश ढाकने, राजेंद्र पाटील, सुरेश ठाकरे, अनिल घुगे, गजानन वंजारी, राहुल सानप, रितेश लाडवंजारी, देवेंद्र लाडवंजारी,स्वप्निल वंजारी, एकनाथ वाघ, महेश घुगे,योगेश लाडवंजारी,योगेश नाईक, विशाल घुगे, ऋषिकेश वाघ, हेमंत सानप, चंद्रकांत घुगे, किरण नाईक, अनिकेत घुगे पाटील, जयेश घुगे पाटील, आकाश वाघ, निरज घुगे, राहुल चंदूलाल सानप, खन्ना पाटील यांच्या सह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.





















