जळगाव मिरर | १३ नोव्हेबर २०२४
परिसरातील लोक कुटुंबियांसह रथ बघण्यासाठी गेलेले असतांना पार्टीशनच्या घराला अचानक आग लागली. काहीवेळातच आगीने शेजारील तीन घरांना देखील आगीच्या विळख्यात घेतले. त्यामुळे त्या घरांमधील एका पाठोपाठ एक असे तीन सिलेंडरचा स्फोट झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील खेडी येथे घडली. घरात कोणीही नसल्याने सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र घरातील संसारपयोगी वस्तू जळून खाक्या झाल्याने कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील खेडी येथील आंबडेरनगर व भोईवाडा परिसरातील प्रिती निवृत्ती गाढे ही महिला दोन मुलांसह वास्तव्यास आहे. आज शहरातून श्रीराम रथोत्सव असल्याने प्रिती गाढे या मुलांना घेवून सायंकाळी रथ बघण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी परिसरातील काही लोक रथाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. सायंकाळी सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास प्रिती गाढे यांच्या घराला आग लागली. या आगीने काही वेळातच रौद्र रुप धारण करीत शेजारील पार्टीशनचे घर देखील आपल्या आगीच्या विळख्यात घेतले. दरम्यान, आगीने संपुर्ण घर जळत असतांना अचानक एकापाठोपाठ एक घरातील तीन सिलींडरचा स्फोट झाला.
आग लागलेल्या बाजुच्या पार्टीशियनच्या घरात संतोष रामा भोई यांची दोन मुले साहिल व दशरथ हे झोपले होते. आग लागल्याचे कळताच संतोष भोई यांनी धावपळ करीत दोन्ही मुलांना बाहेर सुरक्षितरित्या काढले.
मंगलाबाई आधार चौधरी या धुनीभांडी करुन आपला उदनिर्वाह करतात. आग लागल्याचे वे कळताच त्या त्य स्वयंपाक करीत असतांना घराबाहेर पडल्या, त्यांनी त्यांचे पतीलाल बाहेर ओढत बाहेर काढतांना सिलींडरचा स्फोट होत असल्याने संपुर्ण गाव हादरून गेले होते.