जळगाव मिरर | १ नोव्हेबर २०२४
देशभर सध्या दिवाळीची धामधूम तर राज्यात विधानसभा निवडणुक सुरु झाली आहे. तर दिवाळीनिमित्त बाजार पेठेत अनेक वस्तू नागरिक खरेदी करीत असून अनेक ठिकाणी बनावट साहित्य बाजार पेठेत दाखल झाले आहे. तर दुसरीकडे मैनकाईंड फार्मा या कंपनीच्या मॉक्सीकाईड सीव्ही ३७५ या औषधीत बुरशी व छिद्रे आढळून – आल्याची तक्रार करण्यात आल्यान या औषधीचे नमुने एफडीएने तपासणीसाठी पाठविले आहेत. ही औषध सेवन केल्यानंतर रुग्णाल उलटी, मळमळ, जीव घाबरणे व डोकेदुखीचा त्रास झाला. यासंदर्भात गणेश भागवत पाटील (रा.रामेश्वर कॉलनी) यांनी कंपनीविरुध्द जिल्हाधिकारी व अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
या तक्रारीची दखल घेत औषधीचे नमुने घेतले असून तपासणीसाठ प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यावर कारवाईचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक अनिल आयुक्त माणिकराव यांन दिली. तक्रारदार गणेश पाटील यांच मुलगी निकिता हिचा अपघात झाला होता. तिच्यावर उपचार सुरु असताना डॉक्टरांन लिहून दिलेली औषध मेडिकलवरुन घेतली असत त्यात बुरशी व छिद्रे आढळून आले होते.