जळगाव मिरर । २६ ऑक्टोबर २०२५
बोगस कॉल सेंटर प्रकरणात उलबांगडी झाल्यानंतर पोलीस निरीक्षक पद रिक्त होते. त्यांच्या रिक्त जागी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांची नियुक्त करण्यात आली. याबाबतचे आदेश शनिवारी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले.
माजी महापौर ललित कोल्हे यांच्या ममुराबाद रोडवरील फार्म हाऊसमध्ये सुरु असलेल्या बनावट कॉल सेंटवर पोलिसांनी कारवाई केली. पोलीस ठाण्याच्या हद्दीत कॉल सेंटर सुरु असल्याचा ठपका ठेवत तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांची दि. ६ रोजी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. त्यानंतर हा पदाचा कारभार हा दुय्यम अधिकारी सपोनि अनंत अहिरे यांच्याकडे देण्यात आला होता. तसेच पोलीस निरीक्षकांचे पद हे रिक्त होते. त्यांच्या रिक्त जागी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांची बदली करण्यात आली आहे.




















