जळगाव मिरर | २६ एप्रिल २०२४
राज्यातील अनेक जिल्ह्यात सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांचा प्रचार सुरु असून सत्ताधारी व विरोधक एकमेकावर टीकास्त्र सोडत आहे. यात महिला नेत्या देखील मागे नसून भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी थेट शरद पवार, उद्धव ठाकरे व कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यावर लातूर येथील सभेत जोरदार घणाघात केला आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या कि, नाना पटोले लफडेबाज, शरद पवार आणि उद्धव ठाकरे म्हणजे गिधाड आहेत अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे वाघ आहेत असेही त्यांनी म्हंटले आहे. चित्रा वाघ सातत्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी संजय राऊत यांचा नाचा म्हणून उल्लेख केला होता.
यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि या काँग्रेस वाल्यांना मोदी नको आहेत. हे सर्व जण मोदींना हिटलर म्हणतात. सध्या देशातील सगळे भ्रष्टाचारी एकत्र झालेत. सर्व गिधाड एकत्र आपल्या वाघाला घेरायला आलेत. नाना पटोले हे महाराष्ट्र काँग्रेसचे लफडेबाज प्रदेशाध्यक्ष आहेत”, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. उदगीर येथील मेळाव्यात चित्रा वाघ यांनी उपस्थिती लावली. या मेळाव्याला लातूर लोकसभेचे उमेदवार सुधाकर शृंगारे आणि कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे देखील उपस्थित होते. पुढे चित्रा वाघ यांनी महिला मतदारांना आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या, ”मतदान करताना आपल्या नवऱ्याला सोबत घेऊन जा. कोणाचे ही खा मटण मात्र कमळाचेच दाबायचं बटन. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान होणे देशाची नव्हे तर जनतेची गरज आहे”, असे चित्रा वाघ या मेळाव्याला संबोधित करताना म्हणाल्या.