जळगाव मिरर | २४ जानेवारी २०२६
जिल्हा शिक्षण विभागातर्फे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद विद्या निकेतनच्या मैदानावर शहरातील विविध विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर संगीत कवायतीचे आयोजन २६ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता करण्यात आले आहे. त्याबाबत रंगीत तालीम आज मैदानावर घेण्यात आली याप्रसंगी शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले, गटशिक्षणाधिकारी अजित तडवी, महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी खलील शेख, विद्या निकेतनच्या प्राचार्या सुनिता गरुड, क्रीडा समन्वयक राजेश जाधव यांची उपस्थिती होती, याप्रसंगी शहरातील विविध विद्यालयांचे विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
२६ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता विद्या निकेतन मैदानावर ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित केला असून त्यानंतर विविध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे देशभक्ती गीतावर सामुहिक संगीत कवायतीचे आयोजन करण्यात आले आहे यात शहरातील विविध विद्यालयांचे हजारो विद्यार्थी सहभागी होणार आहेत. सदर कार्यक्रमास राज्याचे खच्छता व पाणी पुरवठा मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, जळगाव लोकसभा मतदार संघाच्या खासदार स्मिता वाघ, जळगांव शहराचे आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मिनल करनवाल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.




















