
जळगाव मिरर | ३ मे २०२६
शहराला सुस्वच्छ ठेवण्यासाठी स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता पहाटेपासून कष्ट करणाऱ्या सफाई कामगारांचे योगदान अमूल्य आहे.
आपण सगळे झोपेत असतांना हे सफाई कामगार आपली सामाजिक व मानसिक जबाबदारी चोख बजावतात.
समाजातील सर्वात महत्वाचा पण दुर्लक्षित घटक असलेल्या सफाई कामगारांची दखल घेणे हे आपले नगरसेवक म्हणून कर्तव्य आहे.
१ मे कामगार दिनानिमित्त महानगर पालिका जळगांव प्रभाग क्रमांक १६ मधे नगरसेविका तथा प्रभाग समिती सदस्या सौ. वंदना संतोष इंगळे यांच्या पुढाकाराने प्रभागातील सर्व सफाई व घंटागाडी कामगार असे एकूण ५० कामगारांचा पुष्पगुच्छ, भेटवस्तू चटई, नाश्ता, चहा देवून सत्कार करण्यात आला.
सत्कार करण्यात आलेल्या सर्व कामगारांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रम अयोध्यानगर मधे उद्योजक श्री. संतोष इंगळे यांचे निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रभागातील सर्व नगरसेवक डॉ. श्री. विरेनदादा खडके, मा. उपमहापौर नगरसेवक सुनीलभाऊ खडके, नगरसेवक प्रदीपभाऊ रोटे, नगरसेवक सौ. रंजनाताई वानखेडे, नगरसेवक बाळाभाऊ सोनवणे, नगरसेवक हर्षलभाऊ मावळे उपस्थित होते.
मनपा मुख्य स्वच्छता निरीक्षक श्री. उमेश भालेराव, स्वच्छता निरीक्षक श्री. मयूर सपकाळे व सहकारी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी श्री. वसंतराव महाजन, नंदू पाटील, नितीन नाईक सर, प्रशांत जाधव साहेब, प्रमोद वाणी, दिलीप चौधरी, हर्षल इंगळे, कमलेश महाजन, ज्ञानेश्वर पाटील, पवन इंगळे, मनोज निंबाळकर, समीर चौधरी, संदेश महाजन, सनी कोल्हे, परेश सोनवणे, महिला भगिनी सौ. लताताई कोल्हे, सुवर्णा नाईक, जयश्री अकोले, पाटील ताई, रेखा वाणी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.




















