
मेष : आज आर्थिक महत्त्वपूर्ण निर्णयांचे सकारात्मक परिणाम होतील. वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार वाटचाल ठेवा. तुमच्या उर्जेचा सकारात्मक वापर करा. चुकीच्या गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवू नका. सध्याच्या वातावरणामुळे नकारात्मकता तुमच्यावर येऊ देऊ नका. कुटुंबात आनंदी वातावरण राहिल.
वृषभ : आज दुपारनंतर ग्रहांची स्थिती अनुकूल राहील. या वेळेचा पुरेपूर फायदा घ्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होईरू. जवळची व्यक्ती तुमच्या समस्येचे कारण असू शकते. भावनिक होण्याऐवजी व्यावहारिक निर्णय घ्या. घराच्या व्यवस्थेवरून पती-पत्नीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका.
मिथुन : अनेक दिवसांपासून रखडलेले काम आज कोणाच्या तरी सहकार्याने पूर्ण झाल्याने दिलासा मिळेल. घरातील समस्या सोडवण्यासाठी आणि मदत करण्यासाठी थोडा वेळ द्या. जनसंपर्कात आपला ठसा मजबूत ठेवणे आवश्यक आहे. शेजारी किंवा बाहेरील लोकांशी वाद टाळा. जवळचा प्रवास टाळणे फायदेशीर ठरेल. कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने रखडलेली कामे पुन्हा सुरू करता येतील. पती-पत्नीचे नाते उत्तम राहील. आरोग्य चांगले राहिल, असे श्रीगणेश सांगतात.
कर्क : काही महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी आजचा काळ अनुकूल आहे. तुमची उर्जा योग्य दिशेने वळवा. तुमच्या सकारात्मकतेने आणि संतुलित विचारसरणीमुळे उपक्रम नियोजित पद्धतीने घडतील. अहंकारावर नियंत्रण ठेवा. सध्याचा काळ संयमाने व्यतित करा. चर्चेत अधिक वेळ व्यतित केल्याने यश हातून निसटू शकते. व्यावसायिक कामे सुरळीत सुरु राहतील. जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी असेल. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह : आजचे ग्रहमान अनुकूल आहे. तुमच्या विशेष कार्याची समाजात आणि कुटुंबात प्रशंसा होईल. सर्व कामे पद्धतशीरपणे आणि एकोपा ठेवल्यास यश मिळेल. भावनिक होवून घेतलेला निर्णय हानिकारक ठरेल. घरामध्ये बांधकामाशी संबंधित कामात अडथळा येण्याची शक्यता. काही महत्त्वाची कामेही रखडतील. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा राहिल. आहारावर नियंत्रण ठेवा, असे श्रीगणेश म्हणतात.
कन्या : आज वास्तव परिस्थिती समजून घेवून भविष्यातील योजनांचे नियोजन करा. कुटुंबात शिस्त राहण्यासाठी महत्त्वाचे नियम बनवाल. दुपारनंतर परिस्थिती थोडी अधिक अनुकूल होऊ शकते, असे श्रीगणेश सांगतात. खर्चावर नियंत्रण ठेवा अन्यथा पश्चाताप होऊ शकतो. व्यवसायिक कामे सामान्य राहतील. पती-पत्नीचे नाते मधुर राहिल. आरोग्य चांगले राहील.
तूळ : आज तुम्हाला धावपळीपासून थोडासा दिलासा मिळेल. तरुणांनी भविष्याचे नियोजन करावे. रुपयाच्या हिशेबाबद्दल काही शंका असू शकतात. मित्राबाबत जुना वाद पुन्हा उफाळून येऊ शकतो. कोणतीही समस्या रागावण्याऐवजी शांतपणे सोडवा. व्यावसायिक कामे पूर्वीप्रमाणे सुरू राहतील. कुटुंबीयांसह कोणतेही धार्मिक कार्य पूर्ण होऊ शकते.
वृश्चिक : आजचा दिवस व्यस्त असू शकतो. जवळच्या नातेवाईकांबरोबर संवाद साधाल. आर्थिक स्थिती ठीक राहील. एखाद्या गरजू मित्राला मदत करावी लागू शकते. आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्या. तणाव आणि चिडचिडेपणा तुम्हाला तुमच्या ध्येयापासून वळवू शकतो. व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी पुन्हा विचार करणे आवश्यक आहे. व्यस्तता सोडून कुटुंबासोबत थोडा वेळ घालवल्यास आनंद मिळेल. आळस टाळा, असे श्रीगणेश सांगतात.
धनु : आज तुम्ही घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुमची आर्थिक स्थिती आणि घराची व्यवस्था सुस्थितीत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. धार्मिक व सामाजिक कामात सहभागी व्हाल, असे श्रीगणेश सांगतात. नकारात्मक काम करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. जवळचा मित्र किंवा नातेवाईक तुमच्या त्रासाचे कारण असू शकतात. मनोरंजनासोबतच तुमच्या वैयक्तिक कामांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. व्यावसायिक कामाच्या पद्धतीत काही बदल होऊ शकतात. कौटुंबिक वातावरण चांगले राहिल. दिनचर्या आणि आहाराकडे लक्ष द्या.
मकर : आज मालमत्तेच्या खरेदी संबंधित करार अंतिम होऊ शकतो. ऑनलाइन खरेदी कराल. इतरांवर अवलंबून न राहता तुमच्या कामावर अधिक लक्ष द्या. आज कोणत्याही प्रकारचे कर्ज देऊ नका. मुलांना तुमच्या मार्गदर्शनाची गरज असेल. चुकीच्या गोष्टींकडे लक्ष न देता तुमच्या वैयक्तिक समस्या सोडवा. आरोग्य चांगले राहील.
कुंभ : दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी केली तर दिवस चांगला जाऊ शकतो. मागील काही काळापासून सुरू असलेली चिंताही दूर होऊ शकते. आळस टाळा. अप्रिय बातमीचा तुमच्या कार्य क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. तुम्ही परिश्रमाच्या जोरावर आर्थिक स्थिती स्थिर ठेवाल. कौटुंबिक आनंद कायम राहील. प्रकृतीची काळजी घ्या.
मीन : आज कंटाळवाण्या दिनचर्येपासून मुक्त होण्यासाठी आवडीच्या कामांमध्ये वेळ व्यतित करा. तुमच्या सुप्त कलागुणांना वाव मिळेल. तुमचा आत्मविश्वासही वाढेल. स्वत:ला सकारात्मक कार्यात व्यस्त ठेवल्यास उत्तम. व्यावसायिक दृष्टिकोनातून काळ थोडा अनुकूल असू शकतो. आरोग्य चांगले राहील.



















