जळगाव मिरर | २७ ऑक्टोबर २०२५
जळगाव शहरातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. शहरातील एका चित्रपटगृहातील शौचालयामध्ये गेलेल्या तरुणीचे शेजारील शौचालयातून अर्धनग्न चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना २४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी शाहूनगरनजीक एका मॉलमधील चित्रपटगृहात घडली. याप्रकरणी १७वर्षीय अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, ठाणे येथील १९ वर्षीय तरुणी दिवाळीनिमित्त जळगावात तिच्या मामाकडे आली होती. २४ ऑक्टोबर रोजी ती तिच्या आई व मावशीसह चित्रपट पाहण्यासाठी गेली होती. संध्याकाळी चित्रपट संपल्यानंतर सदर तरुणी शौचालयात गेली. त्यावेळी शेजारील शौचालयातून एक मुलगा मोबाइलमध्ये तिचे चित्रीकरण करीत असल्याचे तिला दिसले. त्यावेळी तरुणी घाबरलेली असल्याने तिने तक्रार दिली नाही. मात्र याप्रकरणी तिने २४ ऑक्टोबर रोजी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



















