जळगाव मिरर | २२ जुलै २०२५
जळगाव शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून दरवर्षी पावसाळा सुरू होण्याआधी ५ मुख्य नाले व 102 उपनाल्यांची साफसफाई करण्यात येत असते. मात्र यंदा ही साफसफाई केवळ कागदावरच आहे की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जळगाव शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पावसाळा येण्यापूर्वी शहरातील ५ मुख्य नाले व शहरातील १०२ उपनाल्याची साफसफाई मोहीम करण्यात येत असते. यंदा देखील ही मोहीम करण्यात आली. मे व जून या महिन्यात ही मोहीम ठेकेदाराच्या माध्यमातून करण्यात आली होती मात्र शहरातील काही ठिकाणी असलेल्या उपनद्यांची साफसफाई झाली नसल्याचे समोर आले आहे तर काही ठिकाणी साफसफाई झाली मात्र त्या नाल्यातील घाण नाल्याच्या बाजूला पडल्याने शहरातील लाखो जळगावकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जळगाव शहर महानगरपालिकेची नाले साफसफाई मोहीम केवळ कागदापूर्तीच व नावापुरतीच आहे की काय असा प्रश्न सध्या जळगावकर विचारू लागला आहे.
नालेसफाईसाठी अंदाजे २५ लाखाचा टेंडर !
जळगाव महानगरपालिका हद्दीत असलेले पाच मुख्य नाले व 102 उपनद्यांची स्वच्छता करण्यासाठी महानगरपालिकेने एका व्यक्तीला प्रभाग क्रमांक एक दोन तीन चार असा एकूण अंदाजे 25 लाखांचा टेंडर दिला दिला आहे मात्र या पंचवीस लाखांमध्ये खरोखर नालेसफाई झाली आहे की नाही याची शहानिशा होणे खूप महत्त्वाचे आहे. यावर आता जळगाव महानगरपालिका प्रशासन काय कारवाई करते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
१०० टक्के नालेसफाई झाली ; आरोग्य विभाग प्रमुख उदय पाटील !
शहरातील सर्वच नाल्यांची साफसफाई झाली असून काही ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे थोड्या फार प्रमाणात वाहून आलेला कचरा असेल असे काही ठिकाणी निदर्शनास आले असता त्याची देखील साफसफाई करण्यात येणार आहे.
