चाळीसगाव : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची “मन की बात” या कार्यक्रमात विद्यार्थी मंत्रमुग्ध होत पंतप्रधानांचा संवाद अतिशय एकचित्ताने ऐकत विद्यार्थ्यांनी वेळोवेळी टाळ्या वाजवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावनेला साद घातल्याने आज खऱ्या अर्थाने पंतप्रधान व विद्यार्थ्यांमध्ये संवादाचा सेतू निर्माण झाला होता.
आज खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून चाळीसगाव तालुक्यातील एकमेव आय एस ओ नामांकित अनु. जाती व नवबौद्ध मुलांच्या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत खासदार उन्मेशदादा पाटील यांच्यासह विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के बी दादा साळुंखे, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील निकम सर, भाजपा शहराध्यक्ष नगरसेवक घृष्णेश्वरतात्या पाटील, भाजपा सरचिटणीस एड. प्रशांत पालवे, भाजपा सरचिटणीस अमोल मानकर, भाजपा सरचिटणीस जितेंद्र वाघ, पंचायत समिती उपसभापती सुनील पाटील, जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब बंडू जाधव, पंचायत समिती माजी सभापती दिनेश बोरसे, पंचायत समिती माजी उपसभापती संजय भास्करराव पाटील, जिल्हा अल्पसंख्यांक महिला अध्यक्षा रिझवाना खान, नगरसेविका विजया पवार युवा मोर्चा जिल्हा पदाधिकारी हर्षल चौधरी, माजी प.स.सदस्य रवी चौधरी, युवा मोर्चाचे अनिल गोत्रे, भाजपा व्यापारी आघाडीचे पदाधिकारी अमित सुराणा, युवा मोर्चाचे पदाधिकारी राहुल पाटील, वाल्मीक महाले, ज्येष्ठ पदाधिकारी रवी राजपूत,बंडू पगार, राजू पगार यांच्यासह शाळेतील शिक्षक गण व विद्यार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मन की बात वर विद्यार्थ्यांची प्रश्नोत्तरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमानंतर खासदार उन्मेशदादा पाटील यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करीत प्रश्न विचारले. विद्यार्थ्यानी उत्स्फूर्त उत्तरे दिलीत. यावेळी तालुकाध्यक्ष प्रा. सुनिल निकम यांनी विद्यार्थ्यांसमोर प्रास्ताविक केले तर नगरसेवक तथा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील यांनी आभार मानले. शहर सचिव अमोल नानकर यांनी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्याचे आश्वासीत केले. विद्यार्थ्यांनी प्रत्येक महिन्याला होणारी मन की बात कार्यक्रम ऐकण्याचा संकल्प केला. प्रभारी प्राचार्य सावदे सर यानी उपस्थितांचे स्वागत केले.