जळगाव मिरर | ९ एप्रिल २०२४
राज्यातील अनेक महामार्गावरून अवैध दारूची तस्करीच्या घटना घडत असतात अशीच एक घटना धुळे जिल्ल्ह्यात अवैध पद्धतीने दारूची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला आहे. जनावरांच्या चाऱ्यात लपवून अवैधपणे बिअरचे बॉक्स वाहून नेले जात होते. यावर शिरपूर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी सापळा रचत अवैधपणे जनावरांच्या चाऱ्यातून बिअरची वाहतूक करणाऱ्यांकडून बिअरचा साठा हस्तगत केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील बोराडी गावाकडून वाहनात अवैधपणे बियरची वाहतूक केली जात होती. गुप्त माहितीदारामार्फत शिरपूर शहर पोलीस अधिकाऱ्यांना ही माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे शिरपूर शहर पोलिसांनी सापळा रचला आणि कारवाई केली.
कारवाईवेळी पोलिसांनी वाहन चालकास वाहन थांबवण्याचा इशारा केला होता. मात्र पोलिसांना पाहून वाहन चालकाने आणखीन वेगाने वाहन पळवले. त्यानंतर पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग केला. काळी अंतरावर पोलिसांनी हा ट्रक आडवला. त्यावेळी ट्रक थांबवून वाहन चालकाने लगेचच पळ काढला. पोलिसांनी वाहन चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलिसांनी संबंधित वाहनातून जवळपास 70 बिअरचे बॉक्स हस्तगत केले आहेत. त्यामध्ये जवळपास एक लाख 82 हजार रुपयांपेक्षा जास्तीची बियर पोलिसांनी हस्तगत केली आहे. त्याचबरोबर एकंदरीत या कारवाईदरम्यान पोलिसांनी 16 लाख 82 हजाराहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत केलाय. पुढील कारवाई शिरपूर शहर पोलीस करत आहेत.




















