जळगाव मिरर | १७ ऑगस्ट २०२३
जळगाव शहरात पुन्हा एकदा चोरटी वाळू चोरीच्या घटनेत सातत्याने वाढ होत असतांना दिसून येत आहे. या वाहतुकीवर पोलीस प्रशासन देखील कारवाई करीत आहे. शहरपासून नजीक असलेल्या कानळदा रस्त्यावरील एका हॉटेलनजीक अवैध वाळूचे ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव ते कानळदा रस्त्यानजीक असलेल्या एका हॉटेलजळील शेतातून दि.१६ रोजी दुपारी ११.३० वाजेच्या सुमारास अवैध वाळू वाहतुकीची माहिती तालुका पोलिसांना मिळाली असता त्यांनी लागलीच या परिसरात गस्त सुरु केली होती. या दरम्यान एक ट्रॅक्टर वाळू घेवून जात असतांना दिसले. यावेळी पोलिसांनी हे ट्रॅक्टर पकडले असून चालक मात्र ट्रॅक्टर व ट्रोली सोडून पळून गेले या ट्रॅक्टरमध्ये १ हजार ५०० रुपये किमतीची वाळू व २ लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर जप्त केले असून अद्याप आरोपी अटक केलेली नाही. हि कारवाई परीधीशिक पोलीस उपाधीक्षक अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.लीलाधर महाजन यांनी केली आहे. या प्रकरणी तालुका पोलीस स्थानकात वाळू चोरी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर हे करीत आहेत.