जळगाव मिरर | १८ नोव्हेबर २०२३
गेल्या अनेक वर्षापासून नेहमीच मोठ्या शहरातील डान्सबार मोठ्या चर्चेत येत असतात, उल्हासनगर शहरांमध्ये अनेक डान्स बार असून हे डान्स बार रात्रभर सुरू असतात अशा तक्रारी सातत्याने वाढू लागल्या होत्या त्यानंतर शहरात सुरु असलेल्या एका डान्स बारवर गुन्हे अन्वेषण विभागाने धाड मारून तब्बल २३ जणांना ताब्यात घेतले असून यात ८ बारबाला तर १५ ग्राहकांचा देखील समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील शांतीनगर परिसरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास असलेल्या डब्ल्यू,डब्ल्यू,एफ या डान्स बारवर उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाने अचानक धाड मारली. यावेळी डान्स बार मधील आठ बारबाला तसेच मद्यप्राशन करण्यास आलेले 15 ग्राहकांना पोलीसांनी ताब्यात घेतले.
याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान उल्हासनगर शहरांमध्ये अनेक डान्स बार असून हे बार रात्रभर सुरू असतात. या डान्स बारवर पोलीस कधी कारवाई करतील असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.