जळगाव मिरर । २६ ऑक्टोबर २०२५
खात्री करण्यासाठी पोलिसांनी डमी ग्राहक पाठविला. तो रुममध्ये पोहचताच त्याने सापळा रचून बसलेल्या पथकातील कर्मचाऱ्याला मिस कॉल देत संकेत दिले. मिसकॉल येताच पोलिसांनी घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकला. यावेळी दोन महिलांची पोलिसांनी सुटका करुन त्यांची आशादीप वस्तीगृहात रवानगी केली तर कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेस अटक केली. त्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील सावखेडा शिवारात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांना मिळाली. त्यांनी त्यांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह तालुका पोलिस, एएचटीयू विभागाचे पथक तयार करून कारवाईच्या सूचना दिल्या. डीवायएसपी नितीन गणापुरे यांच्यासह तालुका पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अनंत अहिरे, योगिता नारखेडे पोहेकॉ धनराज पाटील, प्रवीण पाटील, नरेंद्र पाटील, सचिन साळुंखे, पोकॉ. योगिता पाचपांडे, प्रशांत ठाकूर, मनीषा पाटील, आवेश शेख, अशोक फुसे हे सावखेडा परिसरात पोहचले. पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून त्याला कुंटणखाना असल्याचे समजताच त्याला मिसकॉल देण्यास सांगितले.
ज्या घरामध्ये कुंटणखाना सुरु होता त्या घरातून पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली. त्या जळगाव शहरातीलच वेगवेगळ्या भागातील रहिवासी आहेत. सदर महिलांचा घरमालक महिलेशी संपर्क आला व त्यातून तिने महिलांना वेश्याव्यवसायासाठी घरी बोलवू लागली.
कुंटणखाना चालविणारी महिला ही शारिरीक संबंध ठेवण्याकरीता पीडित महिलांना प्रत्येकी पाचशे रुपये देत असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी त्याठिकाणाहून तीन मोबाईल व निरोधची पाकीटे जप्त केली असून कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेविरुद्ध शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास खीया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६च्या कलम ३. ४ व ५ (१) (क) नुसार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




















