चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यातील कर्मचारी दीपक देविदास ठाकूर याला आज धुळे एसीबीच्या पथकाने पोलिस ठाण्यातच ३ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. विवाहितेच्या छळ प्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपींवर कारवाई करण्यासाठी ठाकूर याने ही लाच मागितली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
विवाहितेच्या छळ प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपींवर कारवाई करण्यासह दोषारोपपत्र न्यायालयात लवकर सादर करण्याच्या मोबदल्यात दीपक ठाकूर याने पाच हजारांची लाच मागितली.त्यानंतर चार हजारात तडजोड करून लाच स्वीकारली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.