जळगाव मिरर | ५ ऑगस्ट २०२४
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आतापासून तयारी सुरु झाली असतांना मनसे देखील गेल्या काही दिवसापासून कामाला लागली आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील राज्याच्या दौऱ्यावर निघाले असतांना त्यांनी आता दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. बाळा नांदगावकर हे मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघातून तर दिलीप धोत्रे पंढरपूरमधून निवडणूक लढवणार आहेत, या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
आगामी विधानसभांच्या निवडणुकांच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत. येत्या ४ ऑगस्टला राज ठाकरे यांच्या नवनिर्माण यात्रेचा पहिला टप्पा मराठवाड्यापासून सुरु होत आहे, अशी माहिती मनसेने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून दिली आहे.