
जळगाव मिरर / २२ एप्रिल २०२३ ।
गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यातील राजकारण तापले आहे त्याचे कारण देखील तसेच काही आहे. राज्यात शिंदे व ठाकरे गट एकमेकावर आरोप प्रत्यारोप करीत असतांना जिल्ह्यात संजय राऊत जिल्हा दौऱ्यावर आलेले आहे. रेल्वे स्थानकावर यांचे आगमन होताच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे दाखवत निषेध केल्याने जळगावात राजकीय तणाव निर्माण झाला होता.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे उद्या दि. 23 रोजी पाचोरा येथे माजी आमदार आर.ओ.तात्या पाटील यांच्या पुतळा अनावरणासाठी दौर्यावर येत आहे. त्यांच्या दौर्यानिमीत्ताने तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रवक्ते खा. संजय राऊत यांचे शुक्रवारी रात्री 8 वा. जळगाव रेल्वेे स्थानकावर आगमन झाले. पालकमंत्री गुलबाराव पाटील यांनी दिलेल्या इशार्यामुळे त्यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रवक्ते खा. संजय राऊत हे आज जळगावात दाखल झाले. रेल्वे स्थानकावर त्यांचे आगमन होताच शिंदे गटाच्या पदाधिकार्यांनी त्यांना काळे कपडे दाखवत त्यांचा निषेध केला. यावेळी पोेलिसांनी शिंदे गटाच्या पदाधिकार्यांना ताब्यात घेत गर्दीला पांगविले.
दरम्यान खा. राऊतांचे आगमन झाले त्यावेळी शिंदे गटाच्या पदाधिकार्यांनी काळे कपडे दाखवत त्यांचा निषेध केला. याप्रसंगी गणेश सोनवणे, सरीता माळी, मनोज चौधरी, गणेश सोनवणे, सोहम विसपुते यांच्यासह शिंदे गटाच्या पदाधिकार्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर खा. संजय राऊत यांचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे यांच्यासह पदाधिकार्यांनी जल्लोषात स्वागत केले. रेल्वे स्थानकावरून खा. संजय राऊत हे थेट जैन हिल्सकडे रवाना झाले.