जळगाव मिरर | १ ऑक्टोबर २०२३
शहरातील मेहरूण परिसरातील रामेश्वर कॉलनीतील श्री हरी हरेश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. विविध वेशभूषेत भाविकांनी वातावरण भक्तिमय केले.
रामेश्वर कॉलनीतील पाण्याच्या टाकीजवळ मोठे हरेश्वर हनुमान मंदिर परिसरात श्री हरी हरेश्वर महादेव मंदिर बांधण्यात आले आहे. त्याची प्राणप्रतिष्ठा नुकतीच करण्यात आली. त्यानिमित्त अभिषेक व प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्याच्या आधी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत भाविकांनी उत्साह दाखविला. महिला भाविकांनी डोक्यावर मंगल कलश घेतले होते. यावेळी हनुमान आणि वानरसेना यांच्या वेशभूषेसह रामायणातील विविध पात्र साकारण्यात आले होते. यासाठीप्रमुख सहकार्य लाभले विशाल देशमुख वआशुतोष पाटील यांचे
शोभायात्रेत नरेंद्र जाधव, दिपक सनसे, सुमित देशमुख, शरद सोनवणे, सुनिल वाणी, दिपक मांडोळे, संदिप चौधरी, निवृत्ती नाथ, अंकुश निकम, भास्कर कचरे, वासुदेव चौधरी, नरेंद्र पाटील,आशिष राजपूत,मंगेश मांडोळे,आकाश तोमर,हर्षल बराटे आदींनी सहभाग घेतला.