जळगाव मिरर | २५ ऑक्टोबर २०२४
शहरातील दूध फेडरेशन रोड परिसरातील नारायणी पार्क भारत नगर या ठिकाणी श्री विघ्नहर्ता गणपती मंदिरामध्ये गणपती बाप्पाचा प्राणप्रतिष्ठाचा सोहळा अतिशय आनंद आणि उत्साह मध्ये संपन्न झाला. दिनांक 18/10/2022 शुक्रवार रोजी संध्याकाळी 6:00 वाजता शोभायात्रा सुरू होऊन भारत नगर राधाकृष्ण नगर पासून नारायणी पार्क पर्यंत आली. तिन्ही कॉलनीतील सर्व स्त्रियांनी रस्ता धुवून काढला व घराच्या समोर रांगोळ्या काढलेल्या होत्या. जवळजवळ तीन तास ढोल ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक संपन्न झाली.दिनांक 19/10/2024 शनिवार रोजी सकाळी 8:00 वाजता प्राणप्रतिष्ठा विधीसाठी दशवीधीस्थान, मांडणी व पूजेस प्रारंभ झाला. दिनांक 20/10/2024 रोजी मंडल,देवता स्थापन,स्नपन, हवन, दीपोत्सव,आरती व गुरुजींनी गायलेले भजन यामुळे पंडाल मधील वातावरण संपूर्ण आनंदी व उत्साही बनले. होम हवन साठी नऊ जोडपे बसलेले होते. दिनांक 21/10/2024 सोमवार रोजी गणपती बाप्पाचे प्राणप्रतिष्ठा सोहळा, विशेष हवन पूर्णाहुती, आशीर्वाद व आरती संपन्न झाली.
मूर्ती बनवण्याचे काम दक्षिण भारतातील मैसूर येथील शिल्पश्री Award winning परमेश आचार्य व त्यांचा मुलगा संदेश आचार्य मूर्तिकारांनी कृष्णा शीला काळ्या पाषाणापासून तीन फुटाची मूर्ती तयार केलेली असून, जे कारागीर अयोध्या येथील श्रीराम मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांपैकी एक कारागीर होते. मूर्तीचे वजन 350 किलो आहे. पंधरा दिवसापूर्वी ज्यावेळेला मूर्ती आली तेव्हा फक्त पाच ते सहा लोकांनी मूर्ती खाली उतरवली. मिरवणुकीच्या वेळेला सात ते आठ व्यक्तींकडून मूर्ती हलत नव्हती. मंदिरात प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला दहा ते बारा व्यक्तींकडून मूर्ती हलत नव्हती. म्हणजेच मूर्तीचे वजन वाढत असल्याचा अनुभव लोकांना आला. प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला मूर्तीला मंदिराच्या प्रदक्षिणेला फक्त 10मिनिट लागले व तेही तीन फुटाच्या जागेत. गुरुजींनी प्राणप्रतिष्ठेचा विधी पूर्ण केला त्यानंतर मूर्ती वरती खूप जास्त तेज प्राप्त झाल्याचे दिसून आले. पंधरा दिवसापूर्वी मूर्ती आल्यानंतर दर्शन घेतलेल्या लोकांपैकी आपल्यावर आलेले संकट दूर झाल्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. कॉलनीतील 40 लोकांचे कुटुंब आहे.
परंतु चार दिवसापासून एकच कुटुंब असल्यासारखे सर्व लोक काम करत होते,सर्व स्त्रियांनी सुद्धा आनंदाने सहभाग नोंदवला. सोमवार दिनांक 21/10/2024 रोजी महाप्रसादाचे आयोजन केलेले होते, जवळजवळ दोन हजार लोकांनी महाप्रसादाचा आनंद घेतला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. सुशीलकुमार जी बाफना, श्रीमती नयनतारा रतनलाल बाफना ,मा. आमदार राजू मामा भोळे,मा.माजी महापौर सौ सीमाताई भोळे,मा. नगरसेवक दिलीपराव पोकळे,मा. हातिम भाई, किरण वाडेकर, सौ नीताताई राजेंद्र चव्हाण जि. प. सदस्य, कानळदा हायस्कूलचे माजी प्राचार्य श्री के.पी.चव्हाण सर, पोतदार स्कुल चे प्राचार्य श्री गोकुळजी महाजन,मा. महेंद्रजी रायसोनी भारत गॅस एजन्सी चे मालक श्री हेमेन्द्र देसाई, हनुमान मंदिराचे पुजारी तपस्वी बालक नाथजी महाराज, additional Deputy Collector सौ पल्लवी जी पौराणिक यांची प्रमुख उपस्थिती होती. जळगाव शहरामध्येसर्वात मोठे एकमेव काळा दगडातील मूर्ती व अतिशय सुंदर मंदिर असल्याचे प्रमुख पाहुण्याने म्हटले आहे, तरी सर्व नागरिकांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.