जळगाव मिरर | १३ नोव्हेबर २०२४
लहान मुलांनी रथावर पुष्पवृष्टी केली जात होती. दरम्यान, दोन गटात फूलै फेकण्यासह फटाके स्वेडण्यावरून वाद होवून दोन गटात तुफान दगडफेक झाली, ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास मेहरुण परिसरातील जोशीचाडा परिसरात घडली. यामध्ये एक जण जखमी झाला. पोलिसांनी येळीच घटनास्थळी धाव घेत जमावावर नियंत्रण मिळविल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मेहरुण परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकशील काही तरुणांनी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास रथ काढला होता. या रथाची परिसरातून मिरवणुक फञ्चत त्यांनी पुष्पवृष्टी करीत ते वाजत गाजत जात होते. यावेळी जोशी वाडा परिसरातील गल्लीतून ते जात असतांना काही जणांच्या अंगावर फुले पडली, वामुळे त्यांच्या शाब्दिक वाद झाला, मात्र दोन्ही गटातील वाद वाढतच जात असल्याने दोन्ही गटांकडून एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यास सुरुवात केली. काही कळण्याच्या आत दोन्ही गट समोरासमोर गेवून दगडफेक करीत असल्याने परिसरात पळापळ सुरु झाली. दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी भेट देवून आढावा घेत सुचना दिल्या.
दगडफेकीची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, दत्तात्रय यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांसह एलसीबीच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत त्यांनी दोन्ही गटातील जमावावर नियंत्रण मिळवले.
पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्यानंतर त्याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, लहान मुलांच्या कारणावरुन वाद झाला होता. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून अफवांवर विश्वास ठेवू नये, दोन्ही गटातील टवाळखोरांचा शोध घेतला जात आहे. तरी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केले आहे