जळगाव मिरर | ११ नोव्हेंबर २०२५
जळगाव-संभाजीनगर रोडवर वाकोद गावालगत काळजाला वेदना होईल असा अपघात झाला. अपघात झाल्यावर गाडीतील नागरिकांना बाहेर काढत असताना गाडीने अचानक पेट घेतला. दरम्यान पतीला वाचवण्यात यश आले मात्र गर्भवती महिलेला बाहेर काढत असताना अचानक गाडीने पेट घेतला. या अपघातात पाच महिन्याच्या गरोदर महिलेचा गाडीमध्ये जळून कोळसा झाला. या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जान्हवी संग्राम मोरे (वय २६) यांचे एक वर्षापुर्वी संग्राम जालमसिंग मोरे (वय ३१) यांच्याशी विवाह झाला होता. संग्राम मोरे हे मुळ बुलडाणा जिल्ह्यातील कोलमखेडा येथील रहिवासी असून बऱ्याच दिवसांपासून संभाजीनगर येथे राहण्यासाठी गेले होते. आज (दि. १०) रोजी कामा निमित्त जान्हवी मोरे या आपल्या पतीसह माहेर असलेल्या बोलडा ता. भुसावळ येथून संभाजीनगर येथे जात होत्या. दरम्यान गावी जात असताना वाकोद जवळ मोरे याच्या वाहनाचा अपघात झाला. ग्रामस्थांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार कारचे अचानक तयार फुटले व अनियंत्रित झालेल्या कारणे डीवायडरला जोरदार धडक दिली. हा अपघात ऐवढा भिषण होता की त्या अपघातात गाडीने पेट घेतला. अगोदर संग्राम मोरे यांना काही ग्रामस्थांनी बाहेर काढले परंतू जान्हवी मोरे यांना काढयचा प्रयत्न करत असताना गाडीने प्रचंड पेट घेतला.
अचानक झालेल्या या भडक्याने अनेकांचा थरकाप उडाला. गाडीने पेट घेतल्यामुळे जान्हवी मोरे यांचा काही मिनिटांतच कोळसा झाला. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार जान्हवी मोरे या पाच महिन्यांच्या गर्भवती असल्यानेया घटनेमुळे अनेकांच्या मनाचा थरकाप उडाला आहे. अपघातात मयत महिलेचे पति संग्राम मोरे हे गंभीररित्या भाजले गेले असून त्यांना वैद्यकीय उपचारासाठी रवाना करण्यात आली आहे.
अपघात झाल्याची माहिती मिळताच वाकोद व पाहुर येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी मदतीला धाव घेतली. पहुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे कर्मचाऱ्यांना घेऊन दाखल झाले. तसेच महामार्ग पोलिस कर्मचारी सुध्दा गस्तीवर असल्याने त्यांनीही मदत कार्य केले. आग विझवण्यासाठी जामनेर येथील अग्निशमन दलाच्या गाडीला वेळ लागल्याने वाकोद येथील भोसले यांचे पाण्याचे ट्रॅक्टर बोलवून ग्रामस्थांनी आग विझवली. रात्री उशिरापर्यंत पहुर पोलीस स्टेशन येथे पहुर वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल निकम यांच्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत दाते करीत आहे.



















