जळगाव मिरर | २२ जानेवारी २०२४
देशातील प्रत्येक रामभक्तांचे स्वप्न आज सत्यामध्ये उतरले असतांना आज अयोध्येतील भव्य राम मंदिराचे मोठ्या थाटामाटात लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी हा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी आज आपले प्रभू राम आले म्हणत देशवासियांना शुभेच्छा दिल्या.
“आज आपले राम आले आहेत. २२ जानेवारी हा दिवस वर्षानुवर्ष लक्षात राहिलं. आपले राम आता झोपडीत राहणार नाहीत, भव्य मंदिरात राहतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. तसेच माझं शरीर अजूनही स्पंदीत असून, चित्त प्राणप्रतिष्ठेच्याच क्षणात लीन आहे,” असे म्हणत पंतप्रधान काही क्षण भावुक झाल्याचेही पाहायला मिळाले.
“मी आज प्रभू रामांची माफी मागतो. आमच्याकडून तपस्येत काहीतरी कमतरता राहिली असावी. कारण आपण इतक्या वर्षात हे काम करु शकतो नाही, आज ते पुर्ण झाले. मला विश्वास आहे की प्रभू श्री राम आपल्याला नक्की क्षमा करतील,” असे पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यावेळी म्हणाले.