
जळगाव मिरर | १७ जून २०२३
देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री युट्यूबच्या माध्यमातून महिन्याला लाखो रुपये कमवीत असल्याच्या माहिती केंद्रीय मंत्रीनी खुद्द दिली आहे.
राज्यातील सर्वात लोकप्रिय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राजकारणापलीकडील व्यक्तिमत्व आहे. त्यांची राजकारण करण्याची शैली देखील वेगळी आहे. याचे अनेक उदाहारण महाराष्ट्रात आहेत. अनेकवेळा भाजपमधील नेत्यांचे कान टोचताना देखील ते मागेपुढे बघत नाहीत. दरम्यान काल नागपूर येथे बोलताना नितीन गडकरी यांनी त्यांच्या एका नवीन व्यवसायाबद्दल माहिती दिली आहे.
नितीन गडकरी युट्यूबद्वारे महिन्याला अडीच ते तीन लाख कसे कमावतात. युट्यूबवरील त्यांचे भाषणे विदेशात जास्त ऐकली जातात. अमेरिका जर्मनीमधील लोक त्यांना ऐकतात, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले. नितीन गडकरी म्हणाले, एका कार्यक्रमात जगभरातील लोक होते. यावेळी उद्घाटन करणारा मी होतो. मी विचारल एवढे मोठे लोक असताना मला का बोलावले, मी काय भाषण करणार. त्यांनी मला सांगितले तुम्हाला माहित नसेल त्यांनी सर्वांनी सांगितले नितीन गडकरी हेच पाहुणे असावेत. कारण अमेरिकेत ते सर्व तुम्हला युट्यूबवर पाहतात. मला युट्यूबवमुळे अडीच ते तीन लाख रुपये महीना मिळतो. पण ते कोण ऐकणारे आहेत मला माहित नव्हते. मला अमेकरित देखील ऐकतात, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.