जळगाव मिरर | २७ जुलै २०२४
पहुर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षक श्री.अमोल श्रावण बावस्कर यांना नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत मानव्यविद्या शाखेच्या अर्थशास्त्र विषयातून विद्यावाचस्पती(Ph.D) या सर्वोच्च पदवीचे नोटिफिकेशन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रो. व्ही. एल.माहेश्वरी यांच्या हस्ते देण्यात आले. डॉ.अमोल बावस्कर यांनी सीमांत शेतकरी व पशुपालन या विषयावर उपप्राचार्य प्रो. डॉ. ए. डी. गोस्वामी पू .ओ.नहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन प्रबंध सादर केला.
या यशातआई-वडील, वैशाली गव्हाळे , प्रा. डॉ एस.डी.जोशी,प्रा.एस.टी धूम, प्रा. एन.एस.बोरसे, या सर्वांचे सहकार्य लाभले. या यशाबद्दल पहूर कसबे उपसरपंच राजूभाऊ जाधव, डॉ. गोपाल वानखेडे, भा.ज.पा.युवा मोर्चा चिटणीस चेतन रोकडे, दिलीप पांडव यांनी पेढा भरवून शुभेच्छा दिल्या