जळगाव मिरर | १५ सप्टेंबर २०२५
आर.सी. पटेल कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड पॉलिटेक्निक, शिरपूर येथील क्रीडासंचालक प्रा. भरत कोळी यांनी शारीरिक शिक्षण विषयातील SET परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून शैक्षणिक क्षेत्रात मोलाची भर टाकली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेतर्फे त्यांचा मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला.
प्रा. भरत कोळी हे उत्कृष्ट शारीरिक शिक्षण विषयाचे लेखक, बालभारती शारीरिक शिक्षण पाठ्यपुस्तक मंडळ पुणे सदस्य, राष्ट्रीय बॉक्सिंग खेळाडू, बॉक्सिंग प्रशिक्षक, तसेच राज्य बॉक्सिंग पंच म्हणून कार्यरत आहेत. क्रीडा क्षेत्रातील त्यांचे योगदान आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद ठरले आहेत. शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील दुहेरी प्रगतीमुळे प्रा. कोळी हे अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.
या सत्कार प्रसंगी धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे खजिनदार जितेंद्र बोरसे, एम.आर. पटेल सीबीएसई स्कूलचे क्रीडा समन्वयक व बॉक्सिंग प्रशिक्षक धीरज पाटील, स्वतंत्र फायनान्सचे मॅनेजर व धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे तांत्रिक अधिकारी ऋषिकेश अहिरे, कबड्डी प्रशिक्षक हेमंत शिरसाठ, के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलचे क्रीडा शिक्षक व राष्ट्रीय बॉक्सिंग खेळाडू नूर तेली, आर.सी.पटेल कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण प्राध्यापक मोहसीन कुरेशी, आयसीआय बँकेचे मॅनेजर डिगंबर धोबी, बॉक्सिंग प्रशिक्षक सागर कोळी आणि सचिव मयूर बोरसे उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी प्रा. भरत कोळी यांना पुढील शैक्षणिक आणि क्रीडा प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
प्रा. भरत कोळी यांच्या या यशामुळे धुळे जिल्हा तसेच संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील क्रीडा व शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढला आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श अनेक तरुण शिक्षक व खेळाडूंना दिशादर्शक ठरणार आहे.
– धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटना