अमळनेर : विक्की उत्तम जाधव
आज भारत देशातील शेतकऱ्यांची अवस्था वाईट झाली आहे.संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.शेतकरीच आत्महत्या का करतो तर शेतक-याला योग्य न्याय नाही. एखादया नेत्याच्या मुलाने, अधिकाऱ्यांच्या मुलांने आत्महत्या केल्या असे ऐकवात नाही. तारणहार नाही. शेतात शेतकऱ्यांनी नाही पेरलं तर काय खाणार धतुरा. या देशातला शेतकरी जगला पाहिजे.
आज या देशातल्या माय, बहिणीवर अन्याय ,अत्याचार होत आहे.मग अशावेळी कृष्ण काय झोपला आहे का?देव आहे ना, मग देव झोपला का? देव नाही ,असता तर त्याने अन्याय होऊ दिला नसता. असे झणझणीत प्रश्न करत प्रबोधन केले. या भारतात बंधुभाव नित्य वसू दे असे तुकडोजी महाराज म्हणतात. “अरे ज्योतिषा माझे हात नका पाहू ,माझ दैव मले कये असे बहिणाबाईनी लिहून ठेवले आहे.आपण शिकलेले, सवरलेले ज्योतिष्याकडे जातो.
आपली लायकी अशी बनवा की, लोक तुम्हाला ओळखतील मेरिटमध्ये या! पत्रकार तुमच्या घरी येतील. पैशाच्या मागे काय पळता, पैसा तुमच्या मागे आला पाहिजे. संपत्ती पेक्षा संतती श्रेष्ठ असते. पूढे किर्तनात सत्यपाल महाराज म्हणाले की, गाडगेबाबांनी धर्मशाळा काढल्या, गाडगेबाबा कधी मंदीरात गेले नाही. त्यांचा देव देवळात नव्हता त्यांनी माणसात देव बघितला. गाडगेबाबा आमचे सगे- सोयरे होते का? नाही,तर मग त्यांनी सर्वांसाठी काम केले आहे.त्यांच्या नावावर कोणतीच संपत्ती नाही. आमचे नेते आमदार होताच कोट्यधीश होतात. मी ५२ वर्षाच्या काळात आजपर्यंत १७,००० हजार गावात जाऊन कीर्तने केली. परिस्थितीने मला शिकवले आहे. आपण एका जातीत आहोत ,एका मकसदसाठी येथे एकत्र जमलो आहोत.आज ज्या महिला नगरसेविका झाल्या, तर त्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याई मुळेच आहेत.
यापूढे ते म्हणाले इस्टेट नसेल तर चालेल, पण दारू पिणारे कुत्रे नको, दारूमुळे किती महिला विधवा झाल्या,त्यांचे संसार उध्वस्त झाले. या सभागृहात कोणी दारू पिणारं नाही हे चांगले आहे.गाडगेबाबांचा बाप दारूत गेला, दारू हळूहळू माणसाला मारते.ज्या महिला विधवा झाल्या त्या नवरा दारू पीत असल्यामुळे. माझे कीर्तन काही कमी लोकांना झोंबते? माझ्यावर चाकू हल्ला झाला मी भ्यालो नाही. माणसाने माणूस होऊन जगावं.
“ना हिंदू बनेगा, ना मुसलमान बनेगा ,इंसान की औलाद है इंसान बनेगा. आम्ही हिंदू मुस्लीम दंगली घडवितो. आम्हाला समजत नाही आमची डोकी कोण फिरवतो..गुजराती, मारवाडी, ब्राम्हण, वाणी हे लोक दंगलीत दिसत नाही. ते उदयोगात, अभ्यासात रमतात. आम्ही झेंडे घेऊन फिरतो, दंगलीत भाग घेतो.
अजूनही खेड्यात स्वच्छता झाली नाही.महिलांना शौचालयाची सोय नाही. खेड्यात महिलांना रस्त्यावर शौचालयासाठी बसावे लागते. गावोगावी संत गाडगे महाराजांनी स्वच्छता केली. आता पुढे इलेक्शन आहे,जातीय दंगली होतील, आपली मुलं दंगलीत मरतात आणि यांचे पोर विदेशात गेली आहेत.आपली बियाणे गावातच असत.नांदेडच्या मुलीने लव मॅरेज केलं तर मुलीच्या बापाने मुलीला जिवंत जाळून मारले. मी जातीयवाद घेऊन नाही बसलो, विदेशात माझे कीर्तन होते परंतु माझा व्हिजा रद्द करण्यात आला. अमेरिकेच्या लोकांनी पुरस्कार दिला. आपण विचाराने मोठे व्हा! आपली विचारसरणीची उंची वाढवा!! जातीजातीत भेदभाव मानू नका. प्रत्येक जातीला महत्व दया.विषमता मानू नका. एका आदिवाशी पोरांने मराठा प्रतिभा शिंदे यांचा वाढदिवस प्रबोधनाच्या कार्यक्रमाने केला. भोंदू साधूच्या नादी लागू नका.तुमचे भले रुद्राक्षाने होणार नाही. त्यात शक्ती असती तर रुद्राक्ष घेण्याचे मेले असते का?कोणताच ग्रह मानवावर असर करित नाही. मंगळ ग्रह किती लांब हे जोतिष्याला किती लांब आहे हे सांगता येत नाही. तो नागपुर मध्ये पूर आला त्यावेळी तो झोपला होता का?विचाराने अविचाराची वाट थांबवली पाहिजे असे प्रबोधनकार सत्यपाल महाराजांनी किर्तनातून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
शुक्रवारी अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात लोक संघर्ष मोर्चा च्या राष्ट्रीय नेत्या “प्रतिभाताई शिंदे” यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध सप्तखंजीरी वादक,सत्यपाल महाराज प्रबोधन किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमात महाराजांचा जाहीर सत्कारही करण्यात आला.
पूढे सत्यपाल महाराज म्हणाले,येथे जात आडवी आली नाही. आमची मुलगी नाचली तर ते ओरडतात. त्यांची नाचली तर ती नर्तिका आहे. आमची गौतमी पाटील हिला नाव ठेवतात. तिला कला आहे ती आपली आहे हे स्विकारले पाहिजे. त्यांच्या घरातील पोरी परधर्मीय घरात आहे. आमची गेली तर तोबा करतात. प्रबोधनकार सत्यपाल महाराजांच्या किर्तनास अभुतपुर्व गर्दी उसळली होती. येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात प्रतिभा ताई यांच्या अनुपस्थितीतही त्यांचा वाढदिवस पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी साजरा केला.
जळगाव येथील चळवळी चे जेष्ठ कार्यकर्ते मुकुंद सपकाळे आणि लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन धांडे,अमळनेर येथील प्रा अशोक पवार,महाराष्ट्र राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष प्रा अर्जुन कोकाटे इत्यादी प्रमुख राजकीय पक्षाचे आणि संघटनांचे कार्यकर्ते तसेच शहरातील असंख्य नागरिक महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिभा ताई शिंदे यांना दिलेलं मानपत्राचे वाचन प्रा. लिलाधर पाटील यांनी केले. प्रास्तविक श्याम पाटील यांनी तर परिचय संदीप घोरपडे यांनी करून दिला. प्रा अशोक पवार यांनी प्रतिभा ताई यांच्या कार्याचा लेखाजोखा मांडत त्या पुरोगामी चळवळीत घडून कश्या आदीवासी कष्टकरी जनतेच्या गळ्यातील ताईत झाल्यात याच सविस्तर विवेचन केलं. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गौतम मोरे यांनी केले.
देशातील उज्जल परंपरेचा उल्लेख करीत त्यांनी सर्व महापुरुषांचा इतिहास सांगत त्यांच्या कार्याने आपण कसे घडलोत याची जाणीव करून दिला, सध्या बुवा बाबांचं पेव उठलंय त्यांना तपासून स्वीकार करावा असा सल्लाही त्यांनी दिला. विधवा महिलांना साड्या आणि विविध सामाजिक प्रश्नांची उत्तरे देणाऱ्यांना सत्यपाल महाराजांनी विविध वैचारिक पुस्तके आणि ग्रामगीता भेट म्हणून दिल्यात.