जळगाव : प्रतिनिधी
वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्तरित्या महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प हा ‘‘खोके सरकारच्या’’ बेजबाबदारपणामुळे गुजरात राज्यात गेला आहे. हा महाराष्ट्रासाठी अन्याय असल्याने याच्या निषेधार्थ शहरातील शिवसेना कार्यालयाजवळ महापालिका प्रवेशद्वारासमोर युवासेनेतर्फे शिंदे-फडणवीस सरकारच्या निषेधार्थ गुरुवार, दि. 15 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी निषेध स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. याप्रसंगी शिवसैनिक व युवासैनिकांसह जळगाव शहराच्या प्रथम नागरिक व महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका व जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ज्ञ संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांची उपस्थिती होती.
वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्तरित्या महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प हा गुजरातला गेल्याच्या विरोधात राज्यभरात युवासेना रस्त्यावर उतरली आहे. महाराष्ट्रातील 1 लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणारा सुमारे 1 लाख 45 हजार कोटींचा हा प्रकल्प ‘‘खोके सरकारच्या’’ बेजबाबदारपणामुळे महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. ही महाराष्ट्रासाठी अत्यंत खेदाची बाब असून महाराष्ट्रातील युवकांसोबत या ‘‘खोके सरकारची’’ धोकेबाजी आहे. त्याच्या निषेधार्थ शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख मा.श्री.आदित्यसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व युवासेना सचिव श्री.वरुणजी सरदेसाई साहेब यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण राज्यात युवासेनेतर्फे निषेध स्वाक्षरी मोहीम घेण्यात येत आहे.
याप्रसंगी शिवसैनिक व युवासैनिकांसमवेत स्वत:ची स्वाक्षरी करुन महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनीसुद्धा निषेध नोंदविला. या मोहिमेप्रसंगी ‘‘खोके सरकारच्या’’ विरोधात जोरदार निदर्शने करुन घोषणा ही देण्यात आल्या. ज्यामध्ये ‘शिंदे-फडणवीस सरकारला साथ.. म्हणजे युवकांच्या रोजगारावर लाथ’, ‘स्वत:साठी खोके आणि महाराष्ट्राला धोके’, ‘अलीबाबा आणि 40 चोर.. दिल्लीश्वरांसाठी लावताहेत जोर’, ‘रोजगार महाराष्ट्राच्या हक्काचा.. नाही तुमच्या बापाचा’, ‘सत्तेसाठी फिरलय मस्तक.. हे तर आहेत दिल्लीश्वरांचे हस्तक’ या घोषणांनी परिसर दणाणले होते.
पत्रकारांशी बोलतांना त्या म्हणाल्या की, ‘‘प्रकल्प गेल्याप्रकरणी मा.मुख्यमंत्र्यांनी गंभीर होण्याची गरज आहे. राज्य आणि देशासमोर बेरोजगारीचे मोठे आवाहन आहे. त्यामुळे बेजबाबदारपणा करुन चालणार नाही. महाराष्ट्राला विकसित होण्यापासून पुढे जाण्यापासून थांबविले जात आहे. राज्याच्या हितासाठी एकत्र येण्याची गरज आहे. हा प्रकल्प अंतिम टप्प्यावर असतांना दुसर्या राज्यात गेल्याने महाराष्ट्र राज्याचे तसेच राज्यातील तरुणांचे मोठे नुकसान झाले आहे.‘’
या निषेध स्वाक्षरी मोहिमेला ज्येष्ठ शिवसैनिक श्री.चिंतामण जैतकर यांच्यासह युवासेनेचे विस्तारक श्री.किशोर भोसले, शिवसेना उपमहानगरप्रमुख श्री.प्रशांत सुरळकर, श्री निलेश पाटील, युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी श्री.पियुष गांधी, महानगर युवा अधिकारी श्री.विशाल वाणी, श्री.यश सपकाळे, श्री.जय मेहता, विधानसभा क्षेत्र युवा अधिकारी श्री.विजय लाड, विद्यापीठ युवा अधिकारी श्री.अंकित कासार, विभाग युवा अधिकारी श्री.अमोल मोरे, युवासैनिक श्री.महेश ठाकुर, श्री.अमित जगताप, युवती अधिकारी कु.जया थोरात, श्री.प्रितम शिंदे, श्री.आबिद खान, श्री.विनोद गायकवाड, श्री.अक्षय पाटील, श्री.गजेंद्र कोळी, श्री.सिद्धेश कोळी, श्री.शोएब खाटीक, श्री.मतीन सैय्यद, श्री.दिपक बोरसे, श्री.राजेंद्र घुगे, श्री.राहुल पोतदार, श्री.अभिजीत रंधे, श्री.यश लोढा यांच्यासह शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.