जळगाव मिरर | ३० ऑक्टोबर २०२३
राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे जोरदार आंदोलन सुरु आहे. तर अनेक जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या गाड्या देखील अडविलेल्या असून आता आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी प्रकृती अतिशय खालावली आहे. जरांगे यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. काल मनोज जरांगे यांचे हात थरथरत असताना दिसत होता.
मात्र आता त्यांची प्रकृती आणखीच खालावली आहे. आज त्यांना उभं देखील राहता येत नाही. अशक्तपणामुळे त्यांना नीट बसता देखील येत नसल्याचं दिसून येत आहे. मनोज जरांगे यांची ढासळलेली प्रकृती पाहून उपस्थित नागरिकांच्या अश्रूंचा बांध फुटला. मनोज जरांगे यांचे कुटुंबिय देखील आंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळी उपस्थित आहेत. उपस्थित मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांची स्थिती पाहून चिंतीत झाले आहे. पाटील तुम्ही पाणी प्या, असं आवाहन नागरिकांकडून केलं जात आहे.
मराठा बंधू-भगिनींच्या आग्रहानंतर मनोज जरांगे दोन घोट पिण्यासाठी तयार झाले आहेत. मात्र आंदोलनावर ते अद्यापही ठाम आहे. ज्यांचे पुरावे मिळालेत त्यांनाच नाही तर मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणीही मनोज जरांगे यांनी केली आहे.