जळगाव मिरर | २६ डिसेंबर २०२३
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य पणन संचालक व जेडीसीसी बॅकचे चेअरमन संजय पवार यांच्या हस्ते “विचार वारसा फाउंडेशन” च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
सामाजिक, शैक्षणिक,गोरगरिबांच्या मदतीला तत्पर ,वैदयकीय मदतीला धावणारे विचार-वारसा फाउंडेशन, जळगांवची दिनदर्शिका २०२४ उत्तम असल्याचे संजय पवार यांनी सांगितले. यावेळी विचार वारसा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष-विशाल देशमुख, अध्यक्ष-आशिष राजपूत, अभिजित राजपूत, लोकेश निकम, गौरव डांगे, ऋषी राजपूत, चेतन राजपूत, मुकेश तायडे आदि सदस्य उपस्थित होते.