
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील इंद्रप्रस्थ नगरातील रहिवासी तथा मनपा कर्मचारी राहुल लक्ष्मण झुंझारराव (वय 32) यांचे दिर्घआजाराने दि.17 रोजी रात्री 7.15 वा. निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दि.18 रोजी सकाळी 9 वा. त्यांच्या राहत्या घरुन निघणार असून शिवाजी नगर वैकुंठधामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, दोन बहिणी,काका, काकू, भाऊ असा मोठा परिवार आहे. ते पवन झुंझारराव यांचे बंधू होत.




















