जळगाव मिरर । २४ सप्टेंबर २०२३
राज्यातील मनसेचे नेते व दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्या ‘ क आणि ख पुस्तक ग्रथांचे प्रकाशन आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना त्यांनी राज्यातील राजकीय स्थितीवर भाष्य केलं आहे. सध्याचं राजकीय वातावरण गढूळ झालं आहे. आजची देशाची आणि महाराष्ट्राची परिस्थिती पाहता मी राजकारणी म्हणवत नसल्याचं राज ठाकरे म्हणाले.
यावेळी बोलतना राज ठाकरे यांनी भारत- इंडिया वादावर उपरोधिक टीका केली. दरम्यान सध्याची राजकीय स्थितीवर त्यांनी परत एकदा नाराजी व्यक्त केलीय. आजचं वातावरण रोजच्या रोज गडूळ होत चाललय. भविष्याला पिढीला आपण काय सांगणार आहोत. दरम्यान राज ठाकरे यांनी यावेळी कुसुमाग्रज यांची कविता वाचली. त्यांची कविता राजकारणाला समजले नाही, ती निदान जनतेला तरी समजली पाहिजे. आपण कोणाला बोलून घेतो कोण माणसे त्यांची काय लायकी आहे, असा टोला त्यांनी राजकीय नेत्यांना लगावला.