जळगाव मिरर । २३ नोव्हेबर २०२२
राज्यात हतबल आणि कमजोर सरकार आहे. सरकारला महाराष्ट्र समजलेला नाही. सत्ताधाऱ्यांमधील कोणत्याही मंत्र्यांनी सीमावादाच्या प्रश्नाला तोंड फोडलेले नाही. कर्नाटकात भाजपचं सरकार आहे. महाराष्ट्रात सुद्धा भाजपच्या नेतृत्वाखाली मिंधे सरकार आहे. अशी टीका संजय राऊत यांनी केली.
तसेच, राज्यात कोणाला मुंबई तोडायची कोणाला विदर्भ वेगळा करायचा आहे. राज्यातील गावं आणि जिल्हे तोडायचं आहे. अशा तऱ्हेने महाराष्ट्र कुरतडण्याचे काम सुरू आहे. गेल्या साडेतीन महिन्यापासून सुरू आहे. आणि हे आमचे मुख्यमंत्री त्यांच्या चाळीस आमदारांना घेऊन गुवाहाटीला निघालेत. गुवाहाटीवरुन आल्यानंतर आसामच्या मुख्यमंत्र्याने एखाद्या जिल्ह्यावर दावा सांगितला नाही म्हणजे मिळवलं. अशी भितीदेखील संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच, ज्या पद्धतीच सरकार महाराष्ट्रात आलं आहे. त्याच्यामुळं संपूर्ण देशातील अनेक राजकीय दरोडोखोरांना वाटतं आपण महाराष्ट्राचे लचके तोडू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होतो. आपण पाहिलं असेल. त्याच्यावर मुख्यमंत्री काय बोलत नाही. हे सरकार लवकरात लवकर घालवलं नाही तर राज्याचे पाच तुकडे होतील. असेही राऊत यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह समर्थक 50 आमदार, आणि 13 खासदारांसह कामाख्या देवीच्या दर्शनासाठी 26 आणि 27 नोव्हेंबर रोजी गुवाहाटीला जाणार आहेत. अशातच आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा केला आहे.