
मुबंई : वृत्तसंस्था
एक हजार कोटींहून अधिक रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ३१ जुलैला मध्यरात्री अटक केली. त्यांना आज दुसऱ्यांदा पीएमएलए कोर्टात हजर केले असता त्यांना ८ ऑगस्टपर्यंत कोर्टाने ईडीची कोठडी सुनावली. राऊतांचा कोठडीतील मुक्काम मिळाला असून त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
वर्षा राऊतांचे आर्थिक व्यवहारांची तपासणी
याप्रकरणी त्यांना 1 ऑगस्टला पीएमएलए कोर्टात हजर केले असता त्यांना चार दिवस पोलिस कोठडी सुनावली. त्यामुळे संजय राऊत यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले पण त्यांना पुन्हा कोठडी मिळाली असून यादरम्यान ईडी आर्थिक व्यवहारांचे तपास करणार आहे.
कोर्टाने ईडीला फटकारले
याप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली. ईडी कोठडीत काही त्रास झाला आहे का असे राऊतांना कोर्टाने विचारले असता राऊत म्हणाले की, मला ज्या ठिकाणी ठेवण्यात आले त्या ठिकाणी योग्य व्हेटिंलेश नाही असा आरोप राऊतांनी ईडीवर केला आहे. तर संजय राऊतांना आम्ही एसीमध्ये ठेवण्याचा दावा ईडीने केला आहे. यानंतर कोर्टाने ईडीला फटकार लगावली.




















