जळगाव मिरर | १८ जानेवारी २०२५
सेंदवा पोलीस स्टेशन जिल्हा बडवाना मधील अपराध क्रमांक १११/२४ मधील फरार आरोपी महेंद्र भगवान राठोड हा महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेलगत असलेल्या पाल भागांमध्ये संशयित फिरतांना मिळून आल्याने त्यांस पकडून त्यांची विचारपूस केली असता ते वरील पोलीस स्टेशन मधील फरारी आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना पोलीस स्टेशन सेंधवा चे कर्मचारी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांच्यावर तिथे एका गुन्ह्यात दोन हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले होते.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच श्रीमती अन्नपूर्णा सिंग मॅडम फैजपूर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल, पोउपनी तुषार पाटील पोलीस हवालदार ईश्वर चव्हाण, पोलीस शिपाई महेश मोगरे पोलीस शिपाई प्रमोद पाटील तसेच महिला पोलीस शिपाई माधुरी सोनवणे यांनी केली आहे.
