जळगाव मिरर / २० फेब्रुवारी २०२३ ।
क्रिकेटच्या मैदानात नेहमीच चर्चेत असलेला सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असलेला रवींद्र जडेजा. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेला. टीम इंडियाने हा सामना सहा गडी राखून जिंकला. रवींद्र जडेजाला त्याच्या घातक गोलंदाजीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याने पहिल्या डावात तीन तर दुसऱ्या डावात सात विकेट घेतल्या.
भारतीय फिरकीपटू रवींद्र जडेजा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. त्याचे इन्स्टाग्रामवर 5 मिलियन फॉलोअर्स आहेत. मात्र तो कोणालाच फॉलो करत नव्हता याचे आश्चर्य वाटते. पण आता त्याने एका व्यक्तीला फॉलो करायला सुरुवात केली आहे. तो त्याच्या पत्नीला नाहीतर ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लायनला फॉलो करतो.
