जळगाव मिरर | १५ जून २०२३
अनेक महिला व पुरुषांना सोन्याची मोठी आवड असते पण गेल्या काही वर्षापासून सोन्यासह चांदीचे दर मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने सोने खरेदी करणे मोठे जिकरीचे झाले आहे. पण ज्यांना सोने खरेदी करायचे असेल त्यांच्यासाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे.
आजच्या काळात, सोन्यातील गुंतवणुकीचा सुरक्षित आणि चांगला परतावा मिळविण्यासाठी सार्वभौम सुवर्ण रोखे (SGB) किंवा गोल्ड इटीएफ (Gold ETF) हा एक चांगला पर्याय आहे. तुम्हालाही स्वस्तात सोने घ्यायचे असेल, तर स्वस्त सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी रिझर्व्ह बँक देत आहे. तुम्ही सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेअंतर्गत स्वस्त सोने खरेदी करू शकता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवारी सांगितले की, सार्वभौम सुवर्ण रोखे योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात 19 जून ते 23 जून दरम्यान स्वस्त सोने खरेदी करता येईल. सार्वभौम सुवर्ण रोखे योजना 2023-24 चा दुसरा टप्पा सप्टेंबरमध्ये जारी केला जाईल.
सरकारने सुरू केलेला हा एक विशेष उपक्रम आहे, ज्या अंतर्गत बाजारापेक्षा कमी किंमतीत सोन्यात गुंतवणूक करता येते. ही एक सरकारी सुवर्ण रोखे योजना आहे. ज्यामध्ये गुंतवलेल्या पैशाच्या सुरक्षिततेची हमी भारत सरकारकडून दिली जाते. ही रोखे योजना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर तुम्ही सार्वभौम सुवर्ण राख्यांमध्ये गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला किमान एक ग्रॅम सोने खरेदी करावे लागेल. तसेच 4 किलो वैयक्तिक, 4 किलो एचयूएफ आणि 20 किलो ट्रस्टच्या नावावर जास्तीत जास्त गुंतवणूक केली जाऊ शकते.
