जळगाव मिरर | १५ सप्टेंबर २०२४
जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातील खडके चाळ बहुउद्देशीय संस्था संचलित श्री गुरुदत्त उत्सव समिती मित्र मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा श्री गणपती अथर्वशीर्ष 21 आवर्तन पठणाचा कार्यक्रम आज दि.१५ रोजी सकाळी मोठ्या उत्साहात करण्यात आला.
शहरातील दूध फेडरेशन रोडवर असलेल्या खडकेचा येथे श्री गुरुदत्त उत्सव समिती मित्र मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील लाडक्या बाप्पा समोर श्री गणपती अथर्वशीर्ष 21 आवर्तन पठणाचा कार्यक्रम मंडळांनी उत्साहात साजरा केला असून यावेळी परिसरातील शेकडो गणेश भक्तांनी याठिकाणी उपस्थिती दिली होती. यावेळी श्री गुरुदत्त उत्सव समिती मित्र मंडळाचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते.